Posts

Showing posts from December, 2025

धुरंधर नावाचा चित्रपट पाहिल्या नंतर...

“When the storytelling goes bad in a society, the result is decadence.” - Aristotle  तुमच्या विचारांचा, विचारधारेचा प्रसार, प्रचार करणारे चित्रपट.  Cinema is a mass medium and it's no surprise if people loaded with political ideology or loyal political organizations use it to serve their purpose.  संवाद करणे माणसाची मूलभूत गरज पण प्रचार करणारा माणूस हा संवाद करणाऱ्या माणसापेक्षा वेगळा आहे.  संवाद साधणारे चित्रपट आणि प्रचार करणारे चित्रपट त्यामुळे वेगळे.  प्रचार हा अघोरी संवाद असतो … काही ठराविक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून केलेला संवाद - हा एका बाजूनेच केलेला संवाद असतो… या मध्ये ऐकणाऱ्याला, पाहणाऱ्याला आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न असतो…  संवाद जितका प्रचारकी तितके त्याचे कला मूल्य -  जीवन मूल्य  कमी होत जाते…

With due apologies to Vinod Kumar Shukla

हताशा से मैं बैठ गया था मुझे कोई नहीं जानता था न कोई मेरी हताशा को जानता था एक व्यक्ति मेरे पास आया उसने हाथ बढ़ाया मैं उसका हाथ पकड़कर खड़ा हुआ मैं उस व्यक्ती को नहीं जानता था नाही उसके हाथ बढ़ाने को जानता था फीर भी हम दोनों साथ चले दोनों एक दूसरे को नहीं जानते थे नाही साथ चलने को जानते थे।

एक लघु कथा...

एक इलेक्ट्रिक व्हीलचेअर, वापरलेली, देणे आहे! 

प्रिय विनोद कुमार शुक्ल....

Image
अगदी काहीच दिवसांपूर्वी  एक रिल पाहताना एका डॉक्युमेंटरी चा उल्लेख त्या मधे झाला "चार फुल हैं और एक दुनिया हैं"! सहजच पाहिली डॉक्युमेंटरी  तर त्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा भेटलात.. तुमचं नावही माहित नव्हतं आधी. आणखी उत्सुकतेन  ऑनलाइन तुमच्या काही कविता शोधल्या  आणि गुंतूनच गेलो  तुमच्या भाषेच्या आणि संवेदनाच्या मायाजालात एका मागून एक आणखी कविता वाचल्या  आणि वाईट वाटलं  वयाच्या सेहचाळीसव्या वर्षी  मी इतक्या उशीरा का तुम्हाला भेटलो? परवा एका पुस्तक प्रदर्शनात गेलेल्या मित्राने फोन केला...  "तुम्ही ऐकवलेल्या त्या कवितेच्या कवीचं पुस्तक इथे आहे, घेऊ का विकत?" म्हटलं, "घे लगेच, तुला पैसे पाठवतो!" परवा तुमचा "अतिरिक्त नहीं" कविता संग्रह वाचायला सुरवात केला आणि काल अचानक तुम्ही गेल्याची बातमी आली...  काही दिवसांपूर्वी तुम्ही माझ्या जगण्याच्या विश्वात कुठेच नव्हता...  आणि आता तुमची संवेदना माझ्यात झिरपतच होती अगदी एका व्यक्ती कडून दुसऱ्यात रक्त संक्रमित व्हावं तसं  तोच तुम्ही गेलात ही बातमी, ही जाणीव..  तुम्ही माझ्या जगण...

हास्यजत्रा आणि व्हिडिओ एडिटिंग

Image
हास्यजत्रेच्या कार्यक्रमांचे व्हिडिओ एडिटिंग जो/ जे करत असतील त्याचं विशेष कौतुक! हास्यजात्रेचं कौतुक नेहमीच अनेक अंगांनी केलं जातं. चांगल्या संहिता, दमदार कलाकार, योग्य दिग्दर्शन आणि त्यामुळे निर्माण होणारा कसदार विनोद या रेसिपी मध्ये खरंतर अचूक संकलनाचाही (व्हिडिओ एडिटिंग) उल्लेख व्हायला हवा.  वरवर पाहता “मल्टीकॅमेरा सेटअपमधून मिळालेल्या व्हिज्युअल्सचं एडिटिंग” असा सरळसाधा व्हिडिओ एडिटिंग चा हा प्रकार वाटतो.  पण नेमक्या कुठल्या संवादाच्या वेळेस कुठला शॉटसाईज वापरावा, कुणाच्या संवादावर कुणाची रीॲक्शन आणि तीही नेमकी किती वेळ ठेवावी, सोबत सुरू असणाऱ्या पार्श्वसंगीतच्या बिट्स वर नेमके कुठे कट्स घ्यावेत, वेगवेगळ्या हास्यप्रकाराचे साउंड ~ कमी, जास्त, मध्यम वेगवेगळ्या पद्धतीने नेमके कसे कुठे वापरायचे, परिक्षकांच्या रीॲक्शन्स, हावभाव नेमके कुठे वापरावेत, एखाद्या चांगल्या “पंच”कडे जाताना एडिटिंगची लय कशी सांभाळावी, याची उत्तम जाणीव एडिटरला/ एडिटिंग टीम ला आहे असं सतत जाणवत राहतं. (किंवा जी काही एडिटर आणि दिग्दर्शक यांच्यामधील प्रोसेस असेल तीही कदाचित याला कारणीभूत असेल). हास्यजत्रेच्...

इथून पुढे...

इथून पुढे पुढून डावीकडे तिथून सरळ एक पाचशे मीटर अंतरावर बाजूला एक चर्च लागेल  तिथे थांबू नकोस सरळ जात राहा तिथे कुणालाही विचारू नकोस थांबू नकोस  जात राहा  एक वडाचं झाड लागेल  त्याखाली ख्रिस्त बसलेला दिसेल... 

Influences on Anurag Kashyap’s Kennedy

Scorsese’s ‘Taxi Driver' entangled neck deep in the Mumbai Police - Politician - Mafia nexus at the end turns into Ramgopal Verma’s ‘Satya’ for redemption…that's Anurag Kashyap’s Kennedy for me ! 

तुझी पोस्ट...

सकाळी उठल्यावर  टेरेसवर आल्यावर  समोरच्यांच्या दारातलं  ते नेहमीचच ओळखीचं  आंब्याचं झाड दिसावं रोजच तशी तुझी पोस्ट दिसते इन्स्टाग्रामवर रोजच सकाळी उठल्यावर मोबाईल उघडल्यावर नेहमीची ओळखीची 

Shrikant Tiwari of the Family Man

MILLENNIAL REPRESNTATION

ती पिढी

त्या पिढीने का नाही सांगितल्या या सगळ्या गोष्टी माझ्या पिढीला आयुष्यच सार इतकं उशीरा का कळल मला...  To be written

शहर...

गाडी चालवताना सिग्नलला थांबल्यावर आजुबाजूला पाहिल्यावर नॉस्टॅल्जिक वाटावं  इतपत शहर बदललंय  किवा आपण जुने झालोय... रस्त्याने जाताना  सहजच आजुबाजूला बघताना जुन्या जागा नजरेस पडल्यावर काळाची अलाइनमेंट बिघडावी इतपत संदर्भ बदललेत किंवा आपण थकून गेलोय.. सहजच समोर आलेले  जुनेच चेहरे नजरेस पडल्यावर  नीट जोर देऊन आठवलं तरी अगदी ओळखच पटू नये इतपत सगळं अभासी झालंय  किंवा आपण पुरते मेलोय.. 

My tryst with Google's Notebook LM

On 3rd Dec, 2025, I used the Google's Notebook LM for the first time. Apparently it seems, it s a kind of facilitating tool to use AI.  But after checking out the credibility information it is offering, I am having too many questions in my mind. First and foremost What is the authenticity, credibility of the information it is offering?  If people feed the internet with wrong information, isn't it oblivious that Notebook LM would spew the same information in make believe and presentable form of podcast, video or infographics? AI can be creative but not with compromised TRUTH!!!