हास्यजत्रा आणि व्हिडिओ एडिटिंग

हास्यजत्रेच्या कार्यक्रमांचे व्हिडिओ एडिटिंग जो/ जे करत असतील त्याचं विशेष कौतुक!

हास्यजात्रेचं कौतुक नेहमीच अनेक अंगांनी केलं जातं. चांगल्या संहिता, दमदार कलाकार, योग्य दिग्दर्शन आणि त्यामुळे निर्माण होणारा कसदार विनोद या रेसिपी मध्ये खरंतर अचूक संकलनाचाही (व्हिडिओ एडिटिंग) उल्लेख व्हायला हवा. 


वरवर पाहता “मल्टीकॅमेरा सेटअपमधून मिळालेल्या व्हिज्युअल्सचं एडिटिंग” असा सरळसाधा व्हिडिओ एडिटिंग चा हा प्रकार वाटतो. 


पण नेमक्या कुठल्या संवादाच्या वेळेस कुठला शॉटसाईज वापरावा, कुणाच्या संवादावर कुणाची रीॲक्शन आणि तीही नेमकी किती वेळ ठेवावी, सोबत सुरू असणाऱ्या पार्श्वसंगीतच्या बिट्स वर नेमके कुठे कट्स घ्यावेत, वेगवेगळ्या हास्यप्रकाराचे साउंड ~ कमी, जास्त, मध्यम वेगवेगळ्या पद्धतीने नेमके कसे कुठे वापरायचे, परिक्षकांच्या रीॲक्शन्स, हावभाव नेमके कुठे वापरावेत, एखाद्या चांगल्या “पंच”कडे जाताना एडिटिंगची लय कशी सांभाळावी, याची उत्तम जाणीव एडिटरला/ एडिटिंग टीम ला आहे असं सतत जाणवत राहतं. (किंवा जी काही एडिटर आणि दिग्दर्शक यांच्यामधील प्रोसेस असेल तीही कदाचित याला कारणीभूत असेल).


हास्यजत्रेच्या भन्नाट एपिसोड्स मध्ये एडिटिंगचही अत्यंत महत्वाचं योगदान आहे असं वाटलं आणि त्यावर काही लिहावं म्हणून ही पोस्ट! 


(याच फॉरमॅट मधले टीव्ही वरचे चला हवा येऊ द्या किंवा त्या सारखे इतर कार्यक्रम पाहताना त्याचं ढिसाळ एडिटिंग लगेचच लक्षात येतं — बाकीच्या पातळ्यांवर असलेली बोंब वेगळीच!)


१३ नोव्हेंबर २०२५ रोजी हा लेख फेसबुक वर पोस्ट केल्यावर हास्यजत्रा टीम मधील बऱ्याच जणांनी या वर कमेंट्स केल्या. त्या कमेंट्स मधून हास्यजत्रा एडिटर्स ची काही नवे मिळाली. त्यांचा इथे उल्लेख करणे उचित राहील 


ऑनलाईन एडिटर

  • शिवाजी बी भोसले 

  • वैभव निवाते

  • दशरथ सिरसट


ऑफलाइन एडिटर -

  • भारत जाधव उमापूरकर 

  • मंदार भोजने


हास्यजत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या कमेंट् मधील हि नावे आहेत - सोबत कमेंट चा स्क्रीन शॉट देत आहे …




Comments

Popular posts from this blog

Zindagi (without ‘soul’) Na Milegi Dobara

Recipe of a South Indian blockbuster

Dear Godfather...