Posts

Showing posts from November, 2025

साबरबोंड च्या निमित्ताने....

Image
ख्रिस्ताच्या शिष्यांसारखे  दोघेही दिसतात संपूर्ण चित्रपटामध्ये फिरताना.. ख्रिस्ताला क्रूसावर संपवल्या नंतर  कासाविस झाले असतील त्याचे शिष्य  आणि शोधत राहिले असतील ख्रिस्ताला…  “प्रेमाचा इतका दुर्दैवी आणि वेदनादायी अंत होऊ शकतो?”,  असा प्रश्न घेऊन हिंडत असतील जेरुसलेमच्या वाळवंटात…  उत्तरं शोधताना त्यांनी स्वतःतही शोधलं असेल ख्रिस्ताला, शोधलं असेल कदाचित एकमेकांमधेही..  हळू हळू स्वतः मध्ये, एकमेकांच्या डोळ्यात, ओळख पटली असेल त्यांना…  सगळी बंधनं पार करून सर्वांना कवेत घेणाऱ्या ख्रिस्ताच्या प्रेमाची…  कदाचित चवही असेल त्या प्रेमाला साबरबोंडाच्या फळाची!

Homebound ...

विषमता वादी वागणूक कुणाला दिली जात असेल तर चित्रपटात ती नेमकी कशी दाखवावी या बाबत बऱ्याच दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांमधून हे प्रयत्न केले आहेत.  प्रियकर प्रेयसीला म्हणतो, “तो पहा, चंद्र!”, हे पुस्तकात वाचण्यासाठी ठीकच वाटतं. पण चित्रपटात प्रियकराला असं म्हणण्याची गरज नसते. त्याने फक्त चंद्राकडे निर्देश करायचा असतो.  चित्रपट ही दृश्य मध्यम आहे म्हणून, असं म्हणणं ही चुकीचं आहे. चित्रपट हे स्थळ काळाशी (spacetime) बांधलेलं माध्यम आहे. Our brain integrates multisensory information to create cohesive experience.  मेंदू मध्ये दृश्य आणि ध्वनी प्रोसेस होण्याच्या जागा वेगळ्या असल्या तरी माणसासाठी हा एकत्रित अनुभव असतो हे नक्की. चित्रपट हे दृश्य आणि ध्वनी या दोहोंचे माध्यम आहे.  चित्रपट हे शब्दांचे माध्यम नक्की नाही, जितकी कविता आणि कादंबरी असते. ते ध्वनी चे माध्यम आहे पण शब्दांचे नक्की नाही. ध्वनी आणि शब्द याची गल्लत करता कामा नये - याची गल्लत केल्यामुळेच चित्रपट हे दृश्य माध्यम आहे असे सरसकटपणे अगदी सगळीकडेच सांगितले जाते.  नीरज घायवान चा होमबाउंड नेमका इथेच गल्लत क...

शब्द...

शब्दांच्या फार जवळ जाऊ नये शब्दांशी फार जास्त मैत्री करू नये फसवे असतात शब्द...