Posts

Showing posts from January, 2026

श्याम मनोहर यांची कादंबरी, “आहाहा” - भाग १ ते ५

“आहाहा” चा पहिला भाग...  श्याम मनोहर यांची सकाळ मध्ये प्रकाशित होणारी कादंबरी, “आहाहा” याचा पहिला भाग वाचला…  कथानक, व्यक्तिरेखा याला पूर्णपणे छेद देत, काहीतरी एक पक्का विचार, Stream of Consciousness सारखा मांडत जायचा, अशी त्यांची आधीपासूनची शैली, पुन्हा एकदा या मधेही दिसली.  फक्त आता ते मांडणारे मुद्दे फारसे नवीन वाटत नाहीत. असे मुद्दे रिल्स च्या स्वरूपात, ऑनलाइन पोस्ट च्या स्वरूपात कुणी ना कुणीतरी ऑनलाइन मांडतच असतं. थोडं राजकीय, थोडं तात्विक, थोडं सामाजिक, थोडं भावनिक, किंव्हा सगळं एकत्र असं काही न काही आजुबाजूला पाहण्यात, ऐकण्यात येतच असतं. बघूया, पुढे कादंबरी कशी जाते ती…  “आहाहा” चा दुसरा भाग... ”शरीर" कादंबरीच्या दुसऱ्या भागात, शरीराचा जिवंतपणा, चेतना, सजीव असणं म्हणजे काय, निर्जीव असणं म्हणजे काय, अशा बऱ्याच गोष्टींचा stream of consciousness शैलीत ऊहापोह केलाय. मधे मित्राची आई जाण्याचा प्रसंग आहे पण त्याचा उद्देश शरीराच्या जिवंतपणाचा विचार करणे एवढाच आहे.  लेखक एका विषयाला धरून सहजपणे, मुक्तपणे एक विचार प्रवाह घेऊन जसा पुढे जातो तशी कादंबरी/ गोष्ट उलगडत ...

With due apology to Sahir...

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया  हर if और but को धुएं में उड़ाता चला गया I have been listening to this beautiful Sahir song for almost last 25 years. At this juncture of life I just thought I should understand this word "फ़िक्र" in a better way... 

सत्या चित्रपट आणि आणि माझी नव्वदीतली पिढी...

Image
स्थळ: राहुल थिएटर, पार्किंगची जागा वेळ: रात्री - १०.३० तारीख: २७ जानेवारी, २०२५ हातांच्या बोटावर मोजता येतील इतक्या गाड्या, पार्किंग व्यवस्था बघणारा मुलगा - वय २० - २२ त्याच्या मित्राबरोबर बोलत उभा…  मी: पार्किंग किती मुलगा: वीस (मी गुगल पे करत… ) मुलगा: (मित्राला) शो कॅन्सल ही था अभी का, अभी लोग आगये मित्र: कौनसा पिक्चर है रे  मुलगा: अरे वो सत्या नामका पुराना पिक्चर ए  मित्र: अच्छा है क्या  मुलगा: पता नहीं, बोलते तो है ओल्ड इज गोल्ड ऐसा…

मी...

मी नावाच्या न संपणाऱ्या एका बोगद्यातून  मी जात राहतो अगदी शेवट पर्यंत  असं समजून की कदाचित  या बोगद्याच्या त्या टोकाला यातून सुटका असेल आणि हा प्रवास संपेल बऱ्याच काळ जात राहतो आणि मग लक्षात येतं की हा प्रवास तर न संपणारा आहे मी आहे तोवर असाच चालू राहणारा आहे  आणि मी आहे  म्हणून या प्रवासात मृत्यूही आहेच.