प्रिय विनोद कुमार शुक्ल....


अगदी काहीच दिवसांपूर्वी 
एक रिल पाहताना
एका डॉक्युमेंटरी चा उल्लेख त्या मधे झाला
"चार फुल हैं और एक दुनिया हैं"!
सहजच पाहिली डॉक्युमेंटरी 
तर त्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा भेटलात..
तुमचं नावही माहित नव्हतं आधी.
आणखी उत्सुकतेन 
ऑनलाइन तुमच्या काही कविता शोधल्या 
आणि गुंतूनच गेलो 
तुमच्या भाषेच्या आणि संवेदनाच्या मायाजालात
एका मागून एक आणखी कविता वाचल्या 
आणि वाईट वाटलं 
वयाच्या सेहचाळीसव्या वर्षी 
मी इतक्या उशीरा का तुम्हाला भेटलो?

परवा एका पुस्तक प्रदर्शनात गेलेल्या मित्राने फोन केला... 
"तुम्ही ऐकवलेल्या त्या कवितेच्या कवीचं पुस्तक इथे आहे, घेऊ का विकत?"
म्हटलं, "घे लगेच, तुला पैसे पाठवतो!"

परवा तुमचा "अतिरिक्त नहीं" कविता संग्रह वाचायला सुरवात केला आणि काल अचानक तुम्ही गेल्याची बातमी आली... 

काही दिवसांपूर्वी तुम्ही माझ्या जगण्याच्या विश्वात कुठेच नव्हता... 
आणि आता तुमची संवेदना माझ्यात झिरपतच होती
अगदी एका व्यक्ती कडून दुसऱ्यात रक्त संक्रमित व्हावं तसं 
तोच तुम्ही गेलात ही बातमी, ही जाणीव.. 

तुम्ही माझ्या जगण्याच्या विश्वात कुठेच नव्हता तो अवकाश
आणि आता तुम्ही आहात पण नाहीत, नसाल तो अवकाश 
या मध्ये अंतर आहे खूप मोठं, खूप जास्त, न कापता येणारं..
आपल्या सूर्यमालेपासून ते एखाद्या कृष्णविवरापर्यंत... इतकं! 


Comments

Popular posts from this blog

Zindagi (without ‘soul’) Na Milegi Dobara

Why 'Dev D' and not 'Devdas'?

Udaan was perfect except ‘that’ scene