श्याम मनोहर यांची कादंबरी, “आहाहा” - भाग ६ ते १०
“आहाहा” चा सहावा भाग... ”शंभर श्रीमंतांची यादी" आता कादंबरीचा पुढचा भाग! वस्तूंची रेलचेल, नात्यांची चाकोरी, चाकोरीतली नाती, आजूबाजूच्या सर्वच गोष्टींचा नीट बघायला गेलं तर एक पॅटर्न आहे. व्यक्तिरेखा कितीही वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाचा एक पॅटर्न आहे. अजून तरी कादंबरीत व्यक्तिरेखा सापडत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींचा एक पॅटर्न सापडतो. वयाच्या सेहचाळीसाव्या वर्षी मलाही आयुष्य कळतं. मलाही पॅटर्न ओळखू येतात. लेखक शब्दात मांडून मी जे ओळखतो त्याला दुजोरा देतो. वाचक म्हणून मला लेखकाकडून अजून काहीतरी हवंय. सभोवताला कडे पाहण्याचा अजून नेटका दृष्टिकोन हवाय. सभोवतालाची सर्जरी मी सुद्धा करू शकतो. कदाचित मी या कादंबरीचा योग्य वाचक नसेन. “आहाहा” चा सातवा भाग... ”संपत्ती" काल एका कविता संग्रहाच्या प्रकाशनाला गेलो होतो. समीक्षक आणि प्रमुख पाहुणे म्हणून आलेले कवी यांनी कविता संग्रहा बद्दल, कवी बद्दल भाषणे केली. अत्यंत अकॅडमीक... साहित्यिक समीक्षेचे सर्व नियम पाळत, आशय, आकृतीबंध, जाणीवा, नेणीवा, कवितेचे उगमस्थान, कवीच्या संवेदना अशा अनेक गोष्टींना स्पर्श करत आपले म्हणणे मांडले. अस...