शहर...

गाडी चालवताना
सिग्नलला थांबल्यावर
आजुबाजूला पाहिल्यावर
नॉस्टॅल्जिक वाटावं 
इतपत शहर बदललंय 
किवा आपण जुने झालोय...

रस्त्याने जाताना 
सहजच आजुबाजूला बघताना
जुन्या जागा नजरेस पडल्यावर
काळाची अलाइनमेंट बिघडावी
इतपत संदर्भ बदललेत
किंवा आपण थकून गेलोय..

सहजच समोर आलेले 
जुनेच चेहरे नजरेस पडल्यावर 
नीट जोर देऊन आठवलं तरी
अगदी ओळखच पटू नये
इतपत सगळं अभासी झालंय 
किंवा आपण पुरते मेलोय.. 

Comments

Popular posts from this blog

Zindagi (without ‘soul’) Na Milegi Dobara

Why 'Dev D' and not 'Devdas'?

Udaan was perfect except ‘that’ scene