साबरबोंड च्या निमित्ताने....


ख्रिस्ताच्या शिष्यांसारखे 

दोघेही दिसतात संपूर्ण चित्रपटामध्ये फिरताना..


ख्रिस्ताला क्रूसावर संपवल्या नंतर 

कासाविस झाले असतील त्याचे शिष्य 

आणि शोधत राहिले असतील ख्रिस्ताला… 

“प्रेमाचा इतका दुर्दैवी आणि वेदनादायी अंत होऊ शकतो?”, 

असा प्रश्न घेऊन हिंडत असतील जेरुसलेमच्या वाळवंटात… 


उत्तरं शोधताना त्यांनी स्वतःतही शोधलं असेल ख्रिस्ताला, शोधलं असेल कदाचित एकमेकांमधेही.. 


हळू हळू स्वतः मध्ये, एकमेकांच्या डोळ्यात, ओळख पटली असेल त्यांना… 

सगळी बंधनं पार करून सर्वांना कवेत घेणाऱ्या ख्रिस्ताच्या प्रेमाची… 

कदाचित चवही असेल त्या प्रेमाला साबरबोंडाच्या फळाची!


Comments

Popular posts from this blog

Zindagi (without ‘soul’) Na Milegi Dobara

Why 'Dev D' and not 'Devdas'?

Udaan was perfect except ‘that’ scene